पंढरपुरात खळबळ पंढरीत भर दिवसा एकावर कोयत्याने जबरी घाव - काळा मारुती चौकातील घटना. शहरात भीतीचे वातावरण

------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर :- पंढरपूर शहरात दिवसाढवळ्या कोयत्याचा बोलबाला शहरातील गजबजलेल्या काळा मारुती चौकात दिनेश देवमारे या युवकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी जखमी केल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आहे. दिनेश देवमारेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर असे वार झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. जखमी दिनेशला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. घटने नंतर तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर शहरात कोयता गॅंग सक्रिय झाली असून अशी भीती पंढरपूरकरांमध्ये कोयता गॅंगची दहशत निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे . याची पंढरपुरामध्ये या घटनेची मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विशाल घोडके हे कशा पद्धतीने आरोपीच्या मुस्क्या आवळतात याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपीच्या विरोधात फिर्याद देण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल घोडके यांच्याशी संपर्क साधला असता " पंढरी नगरी न्यूज" प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की पंढरपुरात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास यांचा मुलहिजा ठेवणार नाही संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस निरीक्षक घोडके यांनी दिला आहे.