मौजे .संगेवाडीत ह.भ. प कै.विलास (तात्या) खंडागळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.बापूसाहेब देहूकर महाराजांचे किर्तन

मौजे .संगेवाडीत ह.भ. प कै.विलास (तात्या) खंडागळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.बापूसाहेब देहूकर महाराजांचे किर्तन

------------------------------------------------------------------------------------

सांगोला( पंढरी नगरी न्युज ) सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे बिनविरोध माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते स्व. विलास (तात्या) तुळशीराम खंडागळे यांचे गेल्या वर्षी मयत झाले होते. शुक्रवार दिनांक 4/4/2025 रोजी त्यांना एक वर्ष पूर्ण होत आहे . त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प बापूसाहेब (महाराज) मोरे देवकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खंडागळे परिवाराकडून देण्यात आली.

शुक्रवार दिनांक. 4/4/2025. रोजी देहू येथील जगद्गुरु तुकाराम (महाराज) यांचे वंशज परमपूज्य गुरुवर्य ह .भ .प बापूसाहेब (महाराज) मोरे देहूकर यांचे मौजे , संगेवाडी व पंचक्रोशीतील नागरिक भाविक - भक्तांना किर्तन श्रवण करण्यासाठी सकाळी 12 : 00 वाजता स्व. विलास (तात्या ) खंडागळे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. हा पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांच्या राहते घरी पंढरपूर- सांगोला रोड वरील वस्तीवर करण्यात येणार आहे. स्व. विलास (तात्या) खंडागळे त्यांचे वडील कै.तुळशीराम खंडागळे हेही पिढी जात माळकरी संप्रदायीक, श्रद्धाळू पंढरीच्या श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेचे भक्त होते .ते पंढरीच्या श्री विठ्ठल - रुक्मिणी - मातेच्या दर्शनासाठी पंढरीला प्रत्येक एकादशीनिमित्त वारी व उपवास करीत असत. आज ते हयात नसल्याने संगेवाडी गावात त्यांची पोकळी निर्माण झाली आहे तसेच संगेवाडी येथील जागृत देवस्थान ह .भ .प प्रभू (अण्णा ) महाराज यांचेही ते भक्त होते.

देहूचे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज, प्रसिद्ध कीर्तनकार ह .भ .प बापूसाहेब महाराज देहूकर यांचे ते शिष्य म्हणून सर्वत्र परिचित होते .तरी कै. विलास (तात्या) खंडागळे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण व अभिवादन करण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खंडागळे परिवाराकडून करण्यात येत आहे.