मुख्यमंत्री कक्ष गरजूंना शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून देणार ३ लाख रुपये..

मुख्यमंत्री कक्ष गरजूंना शस्त्रक्रियेसाठी  मदत म्हणून देणार ३ लाख रुपये..

---------------------------------------------------------------------------------
यासाठी हृदय, यकृत, फुफुस, हात गुडघा प्रत्यारोपण, कर्करोग, मेंदूरोग, नवजात बालके ,मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, हृदय प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्स प्लॉट, यासह इतर आजारावरील उपचारासाठी आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षा कडून मदत दिली जाईल.
--------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने समाजातील गरजू गोरगरिबांना औषध उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

यात फुफुसाची शस्त्रक्रिया गुडघे बदल खुबा बदल शस्त्रक्रिया याचाही समावेश करण्यात आला आहे .तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या कुमकुमत असणाऱ्यांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी कक्ष सुरू करण्यात आले आहे .जन्मताच कर्णबधिर मुलांच्या क्वालिटी क्लिअर इन फ्लॅट शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपये हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण, बोन मॅरो व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये पर्यंत ,व गुडगा. खुबा बदल, शस्त्रक्रिया मेंदू रोग कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया इ. १ लाख रुपयापर्यंत डायलिसिस केमोथेरपी. जळीत रुग्ण ,अस्थिबंधन इत्यादी ५० हजार रुपये तसेच अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत केली जाते.

शस्त्रक्रियेसाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे- आधार कार्ड. रेशन कार्ड १ लाख ६० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला. दवाखान्याचे कोटीशन अपघात झाला असल्यास   किंवा एम. एल. सी रिपोर्ट आवश्यकतेनुसार सिटीस्कॅन .एमआरआय रिपोर्ट किडनी लिव्हर ट्रान्सपोर्ट असल्यास न हरकत प्रमाणपत्राची प्रत, रुग्णांचा फोटो ,लोकप्रतिनिधीचे सध्या उपचार घेत असल्याचे शिफारस पत्र.इ. प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.