शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

पंढरपूर दि.14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे.

            उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरीक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी उपस्थित रहावे असे, अवाहन तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.