आप्पासाहेब पुजारी (गुरव) यांचे दु:खद निधन
शहरातील महाद्वार येथील अटनीचे सराफी व्यावसायिक आप्पासाहेब तुकाराम पुजारी (गुरव) यांचे वयाच्या 54 व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने महाद्वार, सराफ व्यावसायिक, उमदे गल्ली मित्र परिवार, अनेकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सदस्या तथा पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेविका शकुंतला नडगिरे यांचे बंधू होते.