श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे "जागतिक पुस्तक दिना" निमित्त ग्रंथ प्रदर्शन संपन्न...

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे  "जागतिक पुस्तक दिना" निमित्त ग्रंथ प्रदर्शन संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे "जागतिक पुस्तक दिना" निमित्त तीन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.दि. २३ एप्रिल २०२५ बुधवार रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सकाळी ठिक ११-३० वाजता बार्शीती साहित्यिक विक्रम सावळे सर यांच्या शुभ हस्ते उद्घघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयचंद सुराणा (श्री जैनाश्रमचे अध्यक्ष) व प्रमुख पाहुणे भारतभाऊ कोटेचा (श्री जैनाश्रमचे ट्रस्टी ) ॲड.दिनेश श्रीश्रीमाळ (श्री जैनाश्रमचे ऑ.सेक्रेटरी) हे होते. प्रथमतः डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन व प्रास्ताविक वाचनालयाचे ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया यांनी केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा यावेळी वाचनालया तर्फे सत्कार करण्यात आला.

उद्घघाटक विक्रम सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पुस्तक वाचनाने मणुष्य किती समृद्ध होतो. हे त्यांनी आपल्या मनोगनात व्यक्त केले. हे ग्रंथ प्रदर्शन बार्शीतील वाचकप्रेमी व वाचक सभासद यांच्या साठी तीन दिवस ठेवले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप दि. २५ एप्रिल २०२५ शुक्रवार रोजी बार्शीतील सुप्रसिद्ध युवा उद्योजक अतुल सोनिग्रा यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला.यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना वाचनाविषयी त्यांनी आपले अनुभव छान प्रकारे मांडले वाचनामुळे माणसाच्या जीवनात मोठे कसे बदल होतात.हे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ,आनंद सुराणा,रूपेश कांकरिया,अशोक कांकरिया,प्रमोद भंडारी,वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ व आनंद सुराणा यांनी मानले यावेळी वाचनालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.