सरकोली पर्यटन विकास निर्मिती स्थळावर, वृक्षारोपण उत्साहात संपन्न...!
---------------------------------------------------------------------------------
सहकार आयुक्त डॉ. संजय कुमार भोसले यांनी पर्यटन स्थळ निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले.
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शनिवारी दि.१७ रोजी सकाळी सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित असलेले सरकोली चे सुपुत्र व पुणे येथील सहकार आयुक्त डॉ.संजय कुमार भोसले, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पर्यटन चळवळीतील बांधव व कोकणातून आवर्जून उपस्थित असलेले अशोक भोसले सर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर मंदिर पश्चिम बाजूची पाहणी केली. सदर ठिकाणी पावसाळ्याच्या अगोदर आरसीसी पिचिंग करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. संजय भाऊ यांनी सांगितले. त्यानंतर भैरवनाथ मंदिर येथे मार्गदर्शन मिटींग आयोजित करण्यात आली होती सभेला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती . त्यामध्ये ग्रामपंचायतीने नुकताच राजेंद्र जनार्दन भोसले यांचे शेत ते खंडोबा मंदिर पर्यंत २ किलोमीटरचा रस्ता व बिहार पॅटर्नमध्ये २० हजार वृक्ष लागवड, १० शौच्छालय चा प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समिती पंढरपूर येथे पाठवला असल्याचे उपसरपंच भास्कर भोसले यांनी सांगितले. थोड्याच दिवसात प्रा .श्रीधर भोसले सर यांच्या मदतीतून उभारण्यात आलेल्या मातोश्री सुंदर सोपान शिल्पसंग्रहालयाचे काम पूर्ण होत आहे.
त्याचे उद्घाटन आमदार सुभाष बापू देशमुख , आमदार यशवंतराव माने . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम करण्यात येणार आहे. म्हणजे पर्यटन स्थळावरील इतर प्रश्न मार्गी लागतील. तसेच टीचर्स गार्डन चे काम प्रगतीपथावर आहे.
कै. डॉ.राजेंद्र शहा यांचे स्मृती पप्रित्यर्थ मिलिंद शहा यांनी दिलेल्या २५०००/- हजार रुपये निधीतून रोपांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन पूर्ण होत आहे .सुरुवातीला शासनास मुख्य पाच मागण्या कराव्यात त्यानंतर हळूहळू इतर प्रस्ताव शासनास द्यावेत असे डॉ.संजय कुमार भोसले यांनी सुचविले. गावकऱ्यांच्या श्रमदानाने व दानशूर मान्यवर यांनी दिलेल्या मदत निधी मधून पर्यटन स्थळ निर्मीती चे काम प्रगती पथावर आहे. हा प्रकल्प सर्वांच्या हक्काचा आहे.
यातून सरकोली पर्यटन स्थळाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यास सरकोली पर्यटन हे नाव देश व जागतिक स्तरावर जाणार आहे. आपल्या हजारो मुलांना इथे काम मिळणार आहे. आपण इथे न बोलविता स्वता:हून या. श्रमदान करा. आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने परस्थिती नुसार आर्थिक मदत किंवा स्थळ उभे करू शकता. या बाबतीत कोणतेही बंधन नाही. कारण हे तुमच्या आठवणी, स्मृती जागृत ठेवणारे ऐतिहासिक स्थळ होणारआहे.
यावेळी सरकोली हे पर्यटन स्थळ निर्मिती होणार असल्याने पंचक्रोशीतील व गावातील तरुण वृद्ध नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन ऐकण्यासाठी गर्दी केली होती.