बदलापुरात चार वर्शिय चिमूरड्यांवर अत्याचार, मुख्याध्यापिका निलंबित; पोलिसांची बदली, पालकामध्ये संतापाची लाट

बदलापुरात चार वर्शिय  चिमूरड्यांवर अत्याचार, मुख्याध्यापिका निलंबित; पोलिसांची बदली, पालकामध्ये संतापाची लाट

------------------------------------------------------------------------------------

मुंबई (दै.पंढरी नगरी न्यूज ) गेल्या काही दिवसांपासून कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण चर्चेत आहे. यादरम्यान बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेगेल्या काही दिवसांपासून कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण चर्चेत आहे. या दरम्यान बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेस्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असून आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. या घटनेतील आरोपील कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली.

नेमकं आत्तापर्यंत काय घडलं?

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन ४ वर्षांच्या मुलींवर २३ वर्षीय पुरुष सफाई कर्मचाऱ्याने मुलींच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या दोन चिमुरड्यांवर १२ - १३ ऑगस्ट २०२४ रोजी दोन लैंगिक आत्याचार झाले. शाळेकडून मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची १ ऑगस्ट २०२४ रोजी काँट्रॅक्ट वर नेमणूक करण्यात आली होती. आरोपीकडे शाळेतील मुलींचे टॉयलेट साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

शनिवारी रात्री मुलींच्या पालकांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले. या मुलीच्या पालकांनी तिच्या सोबत राहणाऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केल्यावर त्यांनी देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असे सांगितले. यानंतर पालकांनी त्यांच्या मुलींची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. यानंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला, यावेळी पोलिसांनी गु्न्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप देखील केला जात आहे.

पोलिस अधिकाऱ्याची बदली

बदलापूर पूर्व येथील नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, तर काही सफाई कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दोन शाळकरी मुलींवरील अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईमुळे प्रशासनावर देखील राग व्यक्त केला जात आहे. काल पोलिस निरीक्षक शितोळे यांची बदली करण्यात आली असून या ठिकाणी किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदलापूरमध्ये शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा रेल रोको

शाळेच्या मुख्याध्यापिका निलंबित, शाळेने मागितली पालकांची जाहीर माफी

शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळा यादी टाकण्यात आलं आहे.

तसंच या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहातने आण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.

शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेने म्हटलं आहे. तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.

बदलापूरकरांचा उद्रेक! कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा ठप्प; उड्डाणपुलावरील वाहतूक पाडली बंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप यादरम्यान आज मोठ्या संख्येने नागरिकांनी संबंधीत शाळेबाहेर आंदोलन केले. यानंतर नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल्वे लाइनवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या काही पालकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत.

"जो काही प्रकार झाला तो खूप घृणास्पद आणि खूपच लांच्छनास्पद प्रकार आहे. ज्या दिवशी ही घटना कानावर आली तेव्हापासून प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येकाला मुली आहेत. आम्हा सगळ्या महिला मुलींना शाळेत सोडून कामावर जातो. त्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे." असे मत एका महिलेने व्यक्त केले.

"आम्ही कोणी कोणाला ओळखत नाही. आम्ही सगळ्या आपापल्या घरातून आज निषेध करण्यासाठी येथे आलो आहोत. न्याय मिळाला पाहिजे. सगळीकडे अशा घटना घडत आहेत. महिलांवर इतका घाणेरडा अत्याचार का? " असा सवाल देखील यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने उपस्थित केला. दुसऱ्या एका महिलेने सांगितलं की, "मलाही दोन मुली आहेत. मला असं वाटतं की आज झालेल्या प्रकारासाठी आरोपीला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे."

"पोलिस प्रशासन किती कमकूवत आहे हे याच्यावरून दिसून येतं. म्हणजे आरोपीला वाचवतायत, लहानशा चिमुरडीवर अत्याचार झाले तिच्याविषयी हे लोक काही विचारच करत नाहीयेत", असे मतही एका आंदोलनकर्त्या महिलेने व्यक्त केले. जर शाळेत मुलांसोबत असे प्रकार घडत असलीत तर मुलांना कुठे पाठवावं? हाच मोठा प्रश्न आहे असेही मत एका महिलेने बोलून दाखवले.