श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात भारतरत्न महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.....

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात भारतरत्न महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साजरी.....

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज)- बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे भारताचे महामानव भारतरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वाचनालयाचे ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया संचालक प्रमोद भंडारी , श्री जैनाश्रमचे ऑ सेक्रेटरी अँड दिनेश श्रीश्रीमाळ यांच्या शुभ हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. ॲड दिनेश श्रीश्रीमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे विचार आणि त्यांच्या बद्दल चांगली माहिती करून दिली.

यावेळी वाचक वर्ग व सभासद, बी.एम.जाधव, भारत गोणेकर, सलीम शेख, मधुकर गोणेगावक, वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाचे संचालक प्रमोद भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा ग्रंथपाल शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.