शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे बी.एड. (१९९७- ९८ ) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न
_________________________________________________
आज वार रविवार दिनांक ६ /११/२०२२ रोजी IQAC, NSS व माजी विद्यार्थी कल्याणकारी संस्था शिक्षणशास्त्र महाविद्यालय ,बार्शी यांच्या वतीने बी.एड. बॅच सन १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून* महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ सी.एस.मोरे सर, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यमान प्राचार्य डॉ एस.एस. गोरे हे होते. तसेच या प्रसंगी बी.एड. ला अध्यापन करणारे प्राध्यापक डॉ. एम. ए. गायकवाड , डॉ. मोहिते सर, तोडकरी सर, बी.एड. विभाग प्रमुख डॉ एस.डी.भिलेगावकर, माजी विद्यार्थी कल्याणकारी संस्था सचिव तथा बी.पी.एड. विभागप्रमुख डॉ ए. जी . कांबळे सर तसेच महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक श्री तन्वीर बेग सर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व उपस्थित सर्व गुरुजन्नांचा सत्कार करून सर्व माजी विद्यार्थ्यानी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी डॉ ए.जी.कांबळे सर यांनी महाविद्यालयाचा विकास , भौतिक सुविधा व पुढील वाटचाल या संबंधी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व माजी विद्यार्थांनी आपला परिचय दिला. आपला बी.एड. नंतरचा १९९७-९८ पासूनचा जीवन प्रवास व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमासाठी उपस्थित माजी प्राध्यापक डॉ मोहिते सर, तोडकरी सर व डॉ एम. ए.गायकवाड सर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सी.एस. मोरे सर यांनी आरोग्यासाठी व्यायाम करा, आपले क्षेत्र कोणतेही असो प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करा. अशा मुद्यांवर आपले सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ एस.एस. गोरे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना आपण सर्व माजी विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहात याबद्दल सर्वांचे कौतुक केले पाहिजे, भविष्यात महाविद्यालयाशी आपले नाते असेच घनिष्ठ व्हावे, सर्वांनी एकमेकांचा आधार व्हावे व आपण महाविद्यालयासाठी काही योगदान द्यावे अशी इच्छाही व्यक्त केली आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय, IT लॅब, ET लॅब, भाषा प्रयोगशाळा, जिम्नॅशिअम हॉल, स्विमिंग पूल ई. विविध विभागला भेट दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पडवळ सर यांनी केले तर आभार डॉ एस. डी. भिलेगावकर सर यांनी मानले. स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित सर्वांनी एकत्रित स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. व ग्रुप फोटोने कार्यक्रमाची सांगता झाली.
आज तब्बल २३-२४ वर्षानंतर एकत्र स्नेहभेटीचा आनंद सर्व माजी विद्यार्थी व प्राध्यापक यांना अनुभवता आला, हा दिवस सर्वांनी स्मरणात साठवूनच एकमेकांचा निरोप घेतला.
सदर कार्यक्रमाच्या यश्यस्वीतेसाठी डॉ एस. भिलेगावकर, डॉ ए. जी कांबळे, माजी विद्यार्थी श्री रवी कापसे आदींनी परिश्रम घेतले