ब्रम्हपुरीच्या रीलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात 15 दिवसानंतरही पोलीसांकडून न्याय मिळेना, ◼️ राष्ट्रीय महिला आयाेगाने लक्ष घालन्याची गरज...
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) : ब्रम्हपुरी येथील 25 वर्षीय रीलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणाला 15 दिवस उलटूनही अद्याप तिला न्याय मिळाला नसल्यामुळे या प्रकरणाचे गुढ उकलण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा संशय नागरिकामधून व्यक्त होत असून कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व राष्ट्रीय महीला आयाेग यांनी या प्रकरणात गांभीर्यपुर्वक लक्ष घालून या घटनेमागील गुढ जनतेसमोर उघड करुन या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
ब्रम्हपुरीची रीलस्टार रोहिणी पाराध्ये हि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात प्रसिध्द होती त्यामुळे तिचे हजारोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. दि.26 मे रोजी दुपारी 2.30 वाजता सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गालगत ब्रम्हपुरी हद्दीत असलेल्या हॉटेल ग्रामपंचायत मध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही पोलीसांना घटनेच्या मुळापर्यंत जावून तपास करता न आल्यामुळे या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. मयत रोहिणी हिला शारिरीक व मानसिक त्रास दिल्यानेच आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नागरिकामधून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलीस मयत रोहिणीला का न्याय देत नाहीत? असा सवालही केला जात आहे. पोलीस नेमके कोणाच्या बाजूने काम करतात यावरही शंका व्यक्त केली जात आहे. रोहिणी हिने गळफास घेतल्यानंतर हॉटेल मधील फरार झालेला कर्नाटकातील वस्ताद अखेर मंगळवेढा पोलीसात येवून हजर झाला. त्याने घटनेनंतर आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे तो नेमका कोठे आहे याचा तपास पोलीसांना लागत नव्हता. वस्तादने आपल्या जबाबात मोबाईलचा रिचार्ज संपल्यामुळे मोबाईल बंद ठेवला होता. घटना घडल्यानंतर घरी कार्यक्रम असल्यामुळे तात्काळ निघून गेल्याची आश्चर्यकारक माहिती पोलीसांना दिली आहे. यापुर्वीच मयताच्या आई,वडिलाचे व पतीचा जबाब पोलीसांनी नोंदवला आहे. गेली पंधरा दिवस मयतास अद्याप कोणताही न्याय मिळाला नसल्यामुळे कोल्हापूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक यांनीच या प्रकरणात गांभीर्यपुर्वक लक्ष घालून मयत रोहिणी हिस न्याय मिळवून दिल्यास तिला खरी श्रध्दांजली ठरणार असल्याच्या भावना सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत.