अवकाळी पावसाने १०४ गावातील पिकांचे भयंकर नुकसान

अवकाळी पावसाने १०४ गावातील पिकांचे भयंकर नुकसान

------------------------------------------------------------------------------------
                         गारपिटीचा मोसम ओसरला
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील १०४ गावातील पिकांचे सरसकट नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय तयार केला आहे शेतातील आंबा, पेरू, कलिंगड, पपई, कांदा, केळी व ज्वारीच्या ३.४७० हेक्टरचे नुकसान झाले असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवार पडलेल्या पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ तसेच माळशिरस व बार्शी तालुक्यातील २.८० असे १३.८० हेक्टरचे नुकसान झाले. तसेच शनिवारी दुपारपासून जिल्ह्याच्या विविध भागात वादळ वारे गारपीटसह पाऊस पडला होता. त्यामुळे माढा  उत्तर सोलापूर व सांगोला तालुके वगळता ८ तालुक्यातील पिकांना या गारपिटाची झळ पोचली द्राक्षाच्या घरात पाणी शिरल्याने द्राक्ष पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर आंबे गळून पडले आहेत ,ज्वारी गहू पावसाच्या शिडकाव आणि भिजून गेली आहे, शेतातील कडबा काळा पडला आहे, तसेच पपई , पेरूचे कांदा नुकसान झाले शेतकऱ्याकडून सांगण्यात आले.

पूर्व मोसमी म्हणजे मार्च ते मे हंगामात २ प्रती चक्रीवादळे अथवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरा बंगालच्या उपसागरात किंवा किनारपट्टीच्या भूभागावर तयार होत असतात तेव्हा या दोघांमध्ये वाऱ्याची एक प्रकारची विसंगती तयार होत असते.

राज्यभरात होत असलेल्या हवामान बदलाने शेतकऱ्यासह नागरिकांच्या नाकीनव आले असतानाच आता विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट व अवकाळीचे वातावरण पूर्णपणे निवाळ्याची शक्यता आहे .यातून दिलासा मिळणार असतानाच दुसरीकडे ३ दिवसात महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू जवळपास ४ अंशाने पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात एरवी गापिटाचा  कालावधी साधारणतः २६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असा असतो मात्र यावेळी मार्चच्या मध्यनंतर याची नोंद झाली आहे.