सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख पदी ; शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती
____________________________________________________
पंढरपूर (प्रतिनिधी) : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे. सोलापूरला पोलीस अधीक्षक म्हणून शिरीष सरदेशपांडे हे येणार आहेत.
नवे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे सध्या नाशिक येथे पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तेजस्वी सातपुते यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांचा नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.