सिताराम महाराज साखर कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्प उभारण्यास व २५०० वरून ५००० मे. टन गाळपास शासनाची मान्यता - डॉ. राजलक्ष्मी गायकवाड

सिताराम महाराज साखर कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्प उभारण्यास व २५०० वरून ५००० मे. टन  गाळपास  शासनाची मान्यता - डॉ. राजलक्ष्मी गायकवाड

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना लिमिटेड खर्डी येथे प्रस्तावित नवीन 110 के.एल.पी.डी. डिस्टीलरीज प्रकल्पास उभा करण्यासाठी शासनाने तत्वतः मान्यता दिली त्यामुळे कारखाना व शेतकरी यांची प्रगती होणार असल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्यात गेले दोन वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे चांगल्या पद्धतीने कमी कालावधीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर खात्यावर जमा करण्याची महत्त्वाची भूमिका वेळोवेळी कारखान्याने बजावली आहे. त्यामुळे कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांची प्रगती झाली आहे त्याचबरोबर सध्याचा साखर कारखाना प्रकल्पाची दैनंदिन गाळप क्षमता 2500 मे. टनावरून 5000 मे. टना पर्यत वाढ केली आहे. आणि सहवीज निर्मिती प्रकल्प 10 मे. वाँ. वरून 18 मे. वाँ. पर्यंत विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांचे कडून तत्वता इ .सी. ओळखपत्र आणि फाईल दिनांक 6 /9 /2023 रोजी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे कडील मंजुरी दिल्याचे पत्र कारखान्यास प्राप्त झाले आहे.

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व वाहन मालक यांना या गोष्टीचा पुरेपूर फायदा होणार असल्याचे कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.