पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर यांच्यावर अवैद्य वाळू उपसा प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करा - शरद कोळी

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर      यांच्यावर अवैद्य वाळू उपसा प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करा - शरद कोळी

--------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे तहसीलदार यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने सोलापूर जिल्ह्यात महसूल खात्यात खळबळ उडाली.
--------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर शहर येथील भीमा नदीच्या पत्रातील बेसुमार अवैध्य वाळू उपशामुळे भीमा नदीत आजवर लो अनेक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे वाळू चोर माफी आणि चंद्रभागेच्या पात्रात आपल्या मनमानी पद्धतीने जागोजागी खड्डे पडले असल्याने आंघोळीसाठी येणाऱ्या भाविकांना हे खड्डे दिसत नाहीत आणि अचानक या खड्ड्यामुळे भाविकांचा म्हणून मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत यास जबाबदार म्हणून महसूल विभागाचे तथा पंढरपूरची तहसीलदार सुशील बेलेकर यांच्यावर मनुष्यवदासह ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र युवा सेनेचे विस्तार प्रमुख शरद कोळी यांनी एका लेखी पत्रकार द्वारे केली आहे .

चंद्रभागा नदीच्या पत्रातील  वाळूमाफियाकडून रात्रंदिवस वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असते त्यामुळे नदीत जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ज्यावेळी उजनी धरणातून नदीच्या पात्रात पाणी सोडल्यानंतर खड्यासह नदीचे पात्र भरते त्यामुळे पाण्यातील खड्ड्याचा पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आंघोळीसाठी गेले असता खड्ड्याचा अंदाज येत नाही .परिणामी स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यातील खड्ड्यामध्ये बुडून भाविक मयत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे . या अवैध्य वाळू वाहतुकीस पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर यांचे आशीर्वाद आहेत . पंढरपूरचे तहसील कार्यालय पूर्णपणे बदनाम होत आहे.

त्यामुळे यास सर्व प्रकारास पंढरपूर महसूल विभागाचे व पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्यासह या घटने जबाबदार धरून यांच्यावर मनुष्यवदासह ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेनेचे विस्तार प्रमुख शरद कोळी यांनी लेखी पत्रकाद्वारे केली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.