आपल्या माणसांचा सन्मान करायलाही खूप मोठं मन असावं लागतं:- डॉ. जे. जी. जाधव सर

आपल्या माणसांचा सन्मान करायलाही खूप मोठं मन असावं लागतं:- डॉ. जे. जी. जाधव सर

------------------------------------------------------------------------------------
  
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) आपण ज्या गावात जन्मलो, ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो. ज्या गावाने आपणास उमेदीच्या काळात साथ दिली; त्या गावातील प्रत्येक व्यक्ती आणि तत्कालीन सखेसोयरे यांना न विसरता त्यांच्या सतत सहवासात राहून गावाची होईल तेवढी सेवा केली पाहिजे; असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, माजी प्राचार्य डॉ.जे.जी. जाधव सर यांनी व्यक्त केले.

पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील ग्रामस्थ आणि सेवानिवृत्त सन्मान सोहळा समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मानपूर्ती कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील दत्तात्रय जाधव हे होते,अतिशय भावूक होऊन असा सन्मान सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. याचे सर्व श्रेय मी गावातील आयोजक बंधू आणि राजकारण बाजूला ठेऊन त्यांना साथ देणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना देतो; असे मत त्यांनी व्यक्त केले. असे सोहळे झाले पाहिजेत, यामुळे नोकरी वा इतर काही कारणाने परगावी गेलेल्या बंधूंची गावाशी काही अंशी का होईना; नाळ जोडली जाईल असे त्यांनी सांगितले. गावातील प्रमुखांनी एक होऊन गावाच्या विकासासाठी चांगला निर्णय घेतला, आणि चांगले उपक्रम राबविले; तर त्यात खारीचा वाटा म्हणून आमचा नेहमीच हातभार असेल; असेही त्यांनी सांगितले.
       
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी गावातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमूख पाहूणे व व्याख्याते म्हणून लाभलेल्या शिव व्याख्याते शहाजी देशमुख सर यांनी व्याख्यान दिले. गावागावातील तरुणांनी खरा इतिहास वाचला पाहिजे, तो इतिहास जगला पाहिजे आणि आपल्या वैयक्तिक जीवनात आचरणात आणला पाहिजे; असे मत शिव व्याख्याते शहाजी देशमुख सर यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात असंख्य अडचणी आल्या. त्यांनी कोणत्याही प्रसंगी हार न मानता येईल त्या प्रसंगाला सामोरे जाऊन; जगण्याची एक नवी उमेद आपणासमोर सिद्ध करून दाखवली आहे. त्यांच्या विचाराने वागल्यास आपणही आपले जीवन सार्थकी लावू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
       
यावेळी  विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव, पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे, वसंतराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक तानाजी जाधव, विठ्ठलचे  संचालक दशरथ जाधव, साहेबराव  जाधव, जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. डी. गोडसे सर, सारंग जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बजंरंग जाधव हे उपस्थित होते.
   
यावेळी गावातील डॉ. जे. जी. जाधव सर, पोस्टमास्तर सुरेश सावंतराव , भारत  जाधव सर,  शारदा जाधव मॅडम, टेलिफोन ऑपरेटर तुकाराम  जाधव, जलविभाग केंद्र सरकारचे लक्ष्मण जाधव, सर्जेराव जाधव सर, दगडू  सावंतराव गुरुजी,एस. टी. चालक वसंत गोडसे, माजी सैनिक शांतीनाथ  जाधव, अंगणवाडी सेविका  सुशीला राक्षे आणि सेविका श्रीम. मंदाकिनी गोडसे यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानमुर्तीच्या वतीने  शारदा जाधव मॅडम, भारत  जाधव सर, सर्जेराव जाधव सर आणि डॉ. जे. जी. जाधव सर यांनी सत्काराला उत्तर दिले.
       
मान्यवरांचे स्वागत एम. बी. जाधव यांनी केले, सूत्रसंचालन भारत गोडसे सर, हरी गोपीनाथ जाधव सर, डी.बी. जाधव , विठ्ठल शिखरे गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रदीपक भालेकर यांनी केले, सोहळा समितीच्या वतीने किशोर जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. सन्मानमूर्तींचा परिचय नितीन पाटील यांनी करुन दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव सर, आनंद भोपळे, विनोद जाधव, सुधाकर शिंदे, दीपक  जाधव,धनाजी जाधव, तात्या गोडसे, कृषी सहाय्यक विशाल नागटिळक, डॉ.सत्यवान जाधव , गणेश शिंदे सर  गावातील तरुणानी यांनी परिश्रम घेतले. या आभार डी. डी. जाधव सर यांनी मानले.