अखेर राज्यातील निरीक्षणगृह / बालगृहातील कर्मचाऱ्यांना दरमहा नियमीत वेतन देण्याचे मा. मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाकडून " प्रतिज्ञापत्र " दाखल ; शत्रुघ्न कांबळे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) सोलापूर : राज्यातील निरीक्षणग्रह , बालगृहातील कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन देण्याचे मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतल्याचे आदेश मिळाल्याची माहिती महाराष्ट्र निरीक्षणगृह- बालगृह कर्मचारी संघटनेचे सहसचिव शत्रुघन कांबळे यांनी दिली.
राज्यात महिला व बाल विकास विभागा अंतर्गत ४४ निरीक्षणगृहे / बालगृहे कार्यरथ असून त्यामध्ये जवळपास २०० ते २२५ कर्मचारी आपली सेवा देत आहेत शासनाने या संस्थातील कर्मचाऱ्याची सेवा ही "अत्यावशक सेवा " घोषीत केली आहे. या संस्थामध्ये दाखल होणारी प्रवेशित बालके ही अनाथ उपेक्षित एकलपालक दुर्लक्षित व विधिसंघर्षग्रस्त व वाट चूकलेली असतात अशा बालकाच्या काळजी व सरक्षण करण्याची जबाबदारी या संस्था तील कर्मचारी करीत असतात एवढेच नाहीतर त्यांच्यावर सुसंस्कार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र काम या संस्थातील कर्मचारी अहोरात्र करीत असतात परंतू गेल्या अनेक वर्षापासून या अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्याना शासनाकडून कधीत वेळेत वेतन मिळत नव्हते.
कर्मचारी संघटनेने अनेक वेळा यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून देखिल वेतनाचा प्रश्न सुटत नव्हता त्यामुळे कर्मचारी संघटनेचे सचिव बादशहा शेख सर व सहसचिव शत्रुघ्न कांबळे सर यांनी मुंबईस्थित ॲड. अभिजीत कंदारकर साहेब यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात " रिट पिटीशन " दाखल केले त्यावर न्यायालयात कामकाज होवून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मा आयुक्त साहेब मा. उपायुक्त साहेब (बाल विकास) महिला व बाल विकास कार्यक्रम व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल सरक्षण कक्ष म. रा पुणे व कर्मचारी संघानेच्या प्रतिनिधी मध्ये दि २७ जुलै २०२४ स ११ः३० वाजता VDO कॉन्फरन्सव्दारे ऑनलाईन झुम मिटींग झाली यामध्ये कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी दरमहा नियमीत वेतन मिळावे एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली त्यावर मा. आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देवून तशा आशयाचे " प्रतिज्ञापत्र " मा मुंबई उच्च न्यायालयात दिनांक २९ जुलै २० २४ रोजी दाखल केले आहे त्यामुळे. भविष्यात नियमीत वेतन होईल अशी आशा राज्यातील कर्मचाऱ्या मध्ये निर्माण झाली आहे .नियमीत वेतनाचे अनुषंगाने संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे सर यांनी विशेष परिश्रम घेतल्या बद्दल राज्यातील कर्मचारी वृंदाकडून अभिनंदन होत आहे.