कौठाळी, शिरढोण,खेडभाळवणी उप आरोग्य केंद्रातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात.....

-----------------------------------------------------------------------------------
उपआरोग्य केंद्रात आरोग्य सेविका दोन महिने नसल्याचा फटका
-----------------------------------------------------------------------------------
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामकाजावर संबंधित नागरिकांची तीव्र नाराज
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै पंढरी नगरी न्युज): पंढरपूर तालुक्यातील कौठाळी , शिरढोण, खेडभाळवणी या ठिकाणी आरोग्य विभागातील आरोग्य सेविकेची बदली होऊन साधारण दोन महिने झाले असून या तिन्ही ही गावात अद्याप आपल्या विभागाने या गावातील जनतेसाठी नवीन आरोग्य सेविकेची नियुक्ती केली नसल्यामुळे या गावातील सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.या संदर्भात उग्र आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
सध्या थंडीची मोठ्या प्रमाणावर लाट आली असून लहान मुले, वयोवृद्ध माणसं, गरोदर महिला यांना ताप,सर्दी,खोकला,या सारखे आजार होत आहे परंतु या गावात आरोग्य सेविका नसल्याने गोळ्या , औषधे वेळेवर भेटत नसल्याने सर्व सामान्या रुग्णांना फार त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आपण कोरोना सारख्या महामहारीचा आहाकार जवळून पाहिला आहे,अनेक लोक उपाचाराच्या अभावाने मरण पावली आहेत आपल्यात कडे महाराष्ट्र शासनाने किंवा आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दिले असून आरोग्य सेविका नसल्याने अनेक महिला माता भगिनी दवाखान्यात येऊ शकत नाहीत,या तिन्ही ही गावात भीमा नदी आहे अनेक लोक या नदीचे पाणी पितात त्यामुळे रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महिलांच्या बाबतीत किंवा किशोरवयीन मूलीच्या संदर्भात आरोग्य सेविका महिलांचे आजार यांवरही समुपदेशन करू शकतात त्यामुळे गावात आरोग्य सेविकेची बदली झाल्याने आरोग्य धोक्यात आले असून आपण ह्या निवेदनाचा सहानुभूती पूर्वक गांभीर्याने विचार करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयापुढे उग्र आंदोलन छेडण्यात येईल या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी श्नी काळे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, तालुका अध्यक्ष सचिन पाटील,प्रवक्ते रणजित बागल,सरपंच अनिल नागटिळक, उपसरपंच रामदास नागटिळक,ग्रा.प.सदस्य अँड दतात्रय पाटील,माजी सरपंच शंकर गोडसे,ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर गोडसे, संदिप पाटील,हरिभाऊ रानगर नागनाथ शिंदे आदि उपस्थित होते.