शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार :- तहसीलदार मदन जाधव
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज): मंगळवेढा तहसीलदारपदी मदन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. शासन स्तरावरून दोन दिवसांपूर्वीच बदल्या करण्यात आल्या होत्या यामध्ये मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांची करवीर येथे बदली झाली होती त्यांच्या जागी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील तहसीलदार माधव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला.यापूर्वी अचलपूर तालुक्यात शासनाच्या सर्व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे . अमरावती जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात यायला मिळाल्याचा आनंद आहे.शासनाच्या सर्व योजना तळागाळात राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे' अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी स्वागत केले यावेळी ओबीसी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लतीफ तांबोळी,दामाजी शुगर संचालक औदुंबर वाडदेकर, भारत बेदरे, रेवनसिद्ध लिगाडे, शरद जाधव , सतीश पाटील,गोविंद भोरकडे, नागेश कनशेट्टी, बड्डे आदी उपस्थित होते.