मल्लेवाडी येथील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन

------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी (शरदनगर ) येथील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रशालेतील माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आली असल्याचे माहिती शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ माने यांनी दै पंढरी नगरी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
रविवार दि.5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वा. माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा व हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले ,अठरा वर्षानंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात ते दिवस शाळेतले आठवणीच्या मनातलं ,त्या वर्गातल्या पोरी - पोंर आयुष्य होत सांर पुन्हा एकदा थोड्या वेळ साठी का होईना ते अनुभवायला हवं म्हणून तर तुम्ही स्नेहा मेळाव्याला यायला हवं विद्यालयातून शिक्षणाची शिदोरी घेतलेल्या व पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवं असे आवाहनही विद्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे .
सन 2006 इयत्ता दहावी माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू ,शिक्षक भगिनी, कर्मचारी हे नियोजनबद्ध तयारी करीत आहेत . या कार्यक्रमाचे ठिकाण शरद पवार विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय (शरद नगर) मल्लेवाडी येथे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य पंढरीनाथ माने यांनी सांगितले.