महाराष्ट्र शासनाने वृत्तपत्र विक्रेता दिन जाहीर करण्याची संघटनेची मागणी..
_________________________________________________
सोलापूर( प्रतिनिधी):- अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात यावे .अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केली आहे. या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे .जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन दिले.
भारताचे माजी राष्ट्रपती व वृत्तपत्र विक्रेत्यांचे आदर्श डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे १५ ऑक्टोबर हा भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून शासनाने जाहीर करण्याची गरज आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
यावेळी राज्य संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे पंढरपूर यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटक सचिव शाम थोरात .जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग मेंढेगार. बार्शी शहर संघटनेचे अध्यक्ष बाबर उपस्थित होते .