*आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने नंदू पाटील सन्मानित:-*

__________________________________________________
*लातूर,प्रतिनिधी:-* चंद्रशेखर केंगार
उल्लेखनीय कार्य केल्याबाबत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत निलंगा तालुक्यातील एकुजी मुदगडचे पोलीस पाटील नंदू मधुकर पाटील, यांना लातूर येथे कामगार मंत्री नामदार सुरेश जी खाडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सन्मानित करण्यात आलेले हे पोलीस पाटील तालुक्यातील एकमेव पोलीस पाटील असल्याने त्यांचे कासार शिरसी परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.
कासार सिरसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एकुजी मुदगड येथील पोलीस पाटील नंदू पाटील हे इसवी सन 1997 पासून गेली 25 वर्ष ते या भागात पोलीस पाटील म्हणून कार्यभार सांभाळत असून ते नेहमीच गाव पातळीवर सामाजिक समन्वय सार्वजनिक सण उत्सव समारंभात ते सहभाग नोंदवत असत त्यांच्या कार्याची दखल घेत 17 सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने गौरवण्यात आले.
या समारंभास प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आयुक्त अमन मित्तल, अप्पर पोलीस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार स्वप्निल पवार, पोलीस निरीक्षक भातलवंडे, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.