मंगळवेढा शहरातील जबरी सोने चोरी गुन्हयातील महिला आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश

मंगळवेढा शहरातील जबरी सोने चोरी गुन्हयातील महिला आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश

-----------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज )मंगळवेढा पोलीस ठाणे मध्ये मंगळसुत्र चोरीस गेलेले दाखल गुन्हयातील महिला आरोपीना अटक करून त्यांच्याकडुन १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र सुमारे १,००,०००/- रूपये किमतीचे मंगळसुत्र जप्त करून गुन्हा उघडकीस केला.

दिनांक. २५/१२/२०२३ रोजी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दित मंगळसुत्र चोरी झाली होती. यातील घटनेमध्ये यातील फिर्यादी सौ. वैशाली बिरूदेव लवटे वय २८ वर्षे रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा यांनी फिर्याद दाखल केली होती याबाबत सदर कारवाई करण्यात आली तसेच मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शना खाली पोना कृष्णा जाधव यांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रीक पुराव्याचा आधार घेवुन यातील आरोपी नामे उन्चला जयवंत काळे वय ३१ वर्षे, वैशाली जनार्धन काळे वय २५ वर्षे दोघी रा. खडकी.ता. मंगळवेढा यांना खडकी येथुन अटक करून त्याची अटकपुर्व वैदयकीय तपासणी करून आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो, कोर्ट मंगळवेढा यांचे समक्ष हजर करून त्याची ३ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याच्याकडुन सुमारे १,००,०००/- रूपये किमतीचा सोन्याचे मंगळसुत्र आरोपीनी निवेदन पंचनाम्या प्रमाणे काढुन दिला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे सो, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर साो, सोलापुर ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, मा. विकांत गायकवाड सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग, मा. अमोल भारती सो, पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे सोबत पोसई पुरूषोत्तम धापटे, पोहेकॉ विठ्ठल विभुते, पोहेकॉ महेश कोळी, पोहेकॉ प्रमोद मोर, पोहेकॉ सुनिल गायकवाड, मपोहेकॉ सुनिता चवरे, मपोहेकॉ वंदना घोडके, पोना कृष्णा जाधव, पोका अमोल राउत, पोकॉ खंडाप्पा हत्ताळे, पोकॉ युवराज वाघमारे यांनी कारवाई केली आहे.पुढील तपास पोना कृष्णा जाधव नेम. मंगळवेढा पोलीस ठाणे हे करत आहेत.