शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते प्रसिद्ध इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे आज रोजी मारापूरात व्याख्यानाचे आयोजन..
-----------------------------------------------------------------------------------
विद्यमान सरपंच विनायक यादव यांचा ग्रामस्थांच्या वतीने अभिष्टचिंतन सत्कार सोहळा
-----------------------------------------------------------------------------------
मारापूर (दै. पंढरी नगरी न्युज ) : मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त व मारापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उद्योजक विनायक यादव यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ इतिहासकार, प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे (सर) यांचे व्याख्यान शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य अशा प्रांगणामध्ये १ मार्च रोजी सायं.७ वाजता आयोजित केले आहे.
या व्याख्यानानंतर मारापुर ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मंगळवेढा व मारापुर पंचक्रोशीतील व्याख्यान प्रेमीं, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसिद्ध इतिहासकार, शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच विनायकराव यादव सत्कार सोहळा गौरव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.