तुळजापूर नवोदय विद्यालयात संविधान दिवस व २६/११ शहीद जवानांना श्रद्धांजली..!
___________________________________________________
तुळजापूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : जवाहर नवोदय विद्यालय २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री एस. व्ही .स्वामी , शिक्षक वृंद, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . याप्रसंगी उदय वाघमारे या विद्यार्थ्याने संविधानाचे महत्त्व या विषयावरती आपले विचार व्यक्त केले . विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी भारतीय संविधान जगात कसे सर्वश्रेष्ठ आहे सांगून संविधानातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले . भारतीय संविधानाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी अकरा वाजता भारतीय संविधानाची उद्देशिका याचे सामूहिक वाचन सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केले. २६/११ मध्ये शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिट मौन राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधान दिवसाचे महत्व या विषयावरती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन श्री एच.जी.जाधव यांनी केले.