पंढरपूर तहसीलदाराची कार्यप्रणाली कुचकामी झाली..?

पंढरपूर  तहसीलदाराची कार्यप्रणाली कुचकामी झाली..?

---------------------------------------------------------------------------------
तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली..
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज) आजची समाज व्यवस्था आणि प्रशासन ही तेवढेच निरढावलेलं पूर्वीच्या मामलेदारांचा जेवढा जर प्रशासनावर होता तेवढा जरब आत्ताच्या मामलेदार वर हल्ली राहिलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिक तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर सर्वसामान्य नागरिक नाराजी असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. हा प्रत्यय नुकताच करकंब येथील गावठाण रस्त्याच्या प्रकरणात आला आहे.

यामुळेच तहसीलदाराचा आदेश होऊन ही रस्ता होत नसल्याने येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यावर उपोषणाची करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर करकंब येथील सामाजिक कार्यकर्ते विजय माळी यांनी आमरण उपोषण सुरू केली आहे. गावठाण मधील रस्ता होईपर्यंत उपोषणाच्या ठिकाणी उठणार नाही असा ठाम निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवार दिनांक ७ डिसेंबर पासून उपोषण सुरू झालेले आहे. या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी करकंब परिसरातील ग्रामस्थांची उपोषण स्थळी मोठी गर्दी वाढू लागली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कृष्णात माळी यांनी करकंब मधील गावठाण रस्ता सुरू करण्याचा गेल्या तीन वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता या रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद पडला आहे. दिनांक २६ ऑगस्ट २०१९ रोजी पहिली उपोषण त्यांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर केले होते .याची दखल घेत येथील मंडल अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली होती. हा रस्ता गावठाणातीलच आहे यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. ती काढून तहसीलदारांनी रस्ता खुला करून द्यावा असा अहवाल देखील त्यांनी तहसीलदारांना दिला होता यावर हे प्रकरण जागीच थांबले होते रस्त्याच्या या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी पुन्हा विजय माळी यांनी दिनांक २२नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा प्रशासनाला उपोषणास बसणार असल्याची लेखी कळवले होते.

यावेळी तहसीलदारांनी हा रस्ता अतिक्रमणे काढून तात्काळ खुला करून द्यावा असा आदेशही करकम ग्रामपंचायत प्रशासनास दिला होता. तहसीलदारांनी आदेश देऊनही करकंब ग्रामपंचायत प्रशासनाने या रस्त्याबाबत कोणतेही कार्यवाही केली नाही. तहसीलदारांचा  आदेश जुमानला नाही हे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि गावठाण रस्ता खुला करण्यासाठी माळी यांनी पंढरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्याचे ठरवले आहे.

आता पंढरपूरचे तहसीलदार या रस्त्याबाबत काय निर्णय घेणार ,? पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करकंब ग्रामपंचायत प्रशासनावर कोणती कारवाई करणार ? रस्ता खुला होणार की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासन या प्रकरणाला वेगळेच वळण देणार ? याकडे करकम आणि करकंब परस्परांतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.