मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात भोसे प्रादेशिक व म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल आ आवताडेंच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात भोसे प्रादेशिक व म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल आ आवताडेंच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी  न्यूज ) ; मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायीनी असलेली व गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली ४० गावची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना  असून ही योजना बंद होती आमदार अवताडे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत वारंवार पाठपुरावा करून बैठका घेत ही योजना सुरू केली असून शुक्रवारी या योजनेचे  पाणी जुनोनी येथील फिल्टर टाकी मध्ये दाखल झाले आहे. 

ही योजना दीर्घ काळानंतर सुरू झाल्याने या भागातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा बंद होणार असून ऐन उन्हाळ्यात मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे त्याचबरोबर म्हैसाळ योजनेचे १९९२-९३ सालापासून बंद असलेली म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण सात योजनांचा समावेश केला होता यामध्ये आमदार आवताडे यांनी ही योजना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यावेळी सुमारे ३००० कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले होते त्याचे फलित म्हणून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे ही पाणी शेतकऱ्यांना पहावयास मिळत असल्याचे दिसत आहे.

म्हैसाळ योजनेचे सध्या वितरिका एक मधून रविवारी लोणार महमदाबाद हुन्नूर भागात पाणी पोहोचले आहे तर वितरिका दोन मधून मारोळी शिवारात पाणी दाखल झाले आहे तर जंगलगी, चिखलगी,पौट,सलगर खुर्द,सलगर बुद्रुक या गावांनाही लवकरच पाणी मिळणार आहे तर उमदी डी. वाय मधून आसबेवाडीत पाणी दाखल झाले असून सोड्डी, शिवनगी येळगी या भागांनाही लवकरच पाणी मिळणार आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील उर्वरित गावांना ही लवकरच पाणी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार आवताडे यांनी सांगितले.

भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित परंतु गेल्या अनेक दिवसापासून ही योजना विज बिल व पाणीपट्टी थकीत असल्याने या भागातील या योजनेचे पाणी मिळत नव्हते परंतु या भागातील महिला वर्गांची पाण्यासाठी होणारे कुचंबना दूरवरून डोक्यावर हंड्याद्वारे आणलेले पाणी विकतचे टँकर घेऊन पाण्याची गरज भासणार नाही हे चित्र या भागात दिसून आल्याने आमदार समाधान आवताडे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा चंग बांधला त्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत तीन ते चार वेळा बैठका घेतल्या. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे - पाटील , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना चालू करण्यासाठी धडपड सुरू ठेवली.

आ. आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी आणि स्थानिक  प्रशासन यंत्रणेकडे लावलेला  रेटा  कामी आला आहे ह्या योजनेचे ३५ लाख रुपये बिल महावितरण कडे प्रशासनाने भरले असून दुरुस्तीसाठी दहा लाखाची तरतूद करीत सर्व यंत्रांच्या माध्यमातून योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. आमदार आवताडे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे शुक्रवार, दिनांक २६ मे २०२३ रोजी जुनोनी येथील फिल्टर टाकीमध्ये या योजनेचे पाणी पोहचले आहे. हे पाणी योजनेच्या पुढील टप्प्यात साठी मार्गक्रमण झाले आहे या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यात दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.