राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

_____________________________________________________

(दै.पंढरी- नगरी न्यूज) : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश गृह विभागाने काढला आहे. यामध्ये १०९ वरिष्ट पोलिस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आलाय.या बदल्यांमध्ये अनेक पोलिस अधिकारी मुंबईतून बाहेर पाठविण्यात आले आहेत.
तर बाहेरून देखील अनेक अधिकारी मुंबईत रुजू होणार आहेत.
मुंबई पोलीस दलात बदल...
गृह विभागाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई पोलीस दलात किमान १४ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकारी प्रणय अशोक यांची मुंबईहून नवी मुंबईला तर मंजुनाथ शिंगे यांची सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्य पोलिस महासंचालक कार्यलयात नियुक्ती करण्यात आली आहे.तर आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख, एम रामकुमार, अनिल पारसकर, मनोज पाटील, अमोघ गावकर, तेजस्वी सातपुते आणि गौरव सिंग यांची मुंबई पोलिसांत बदली करण्यात आली आहे. प्रवीण मुंढे, दीक्षितकुमार गेडाम, मंगेश शिंदे, अजय बन्सल, मोहित गर्ग, पुरुषोत्तम कराड यांचाही आदेशानुसार मुंबई पोलिसात बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.