नंदेश्वर( ता. मंगळवेढा) येथील तिहेरी खून प्रकरणातील गुढ पोलिसांकडून उघडकीस
-----------------------------------------------------------------------------------
सदर आरोपीस कोर्टाने २८ फेब्रुवारी पर्यंत पी. सी. आर कस्टडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने यांनी दिली.
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) दि २१/२/२०२३ रोजी सायंकाळी ०५/३०वाचे सुमारास मोजे नंदेश्वर येथील पोलीस पाटील यांनी मंगळवेढा पोलीसांना कळविले की, मौजे नंदेश्वर येथील लवटे वस्ती ता. मंगळवेढा येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी १) दिपाली बाळु माळी वय २५ वर्षे २)पारुबाई बाबाजी माळी वय ५५ वर्षे. ३) संगीता महादेव माळी वय ४७ वर्षे रा नंदेश्वर या तीन महिलांचा अज्ञात हत्याराने व दगडाने मारुन खुन केल्या आहे. व त्या घराच्या जवळ वेगवेगळ्या ठिकाणी शेतात पडलेल्या आहेत. अशी माहिती दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई सौरभ शेटे, परि. पोसई धापटे, सपोफी अविनाश पाटील, पोहेकॉ दयानंद हेंबाडे पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोना विठ्ठल विभुते, पोना विक्रम काळे, पोना बापू पवार, पोकों कैलास खटकाळे पोकों राजु आवटे हे तात्काळ घटनास्थळी रवाना होवुन तेथील परस्थितीची पाहणी केली.
पोलीसांनी तेथील आजुबाजुच्या लोकांकडे सदर खुन कोणत्या कारणासाठी, कशामुळे, कोणासोबत पुर्वीची भांडणे होती. काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला व गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने चौकशी करुन संशयीत व्यक्ती समाधान महादेव लोहार वय- ३३ वर्ष रा नंदेश्वर ता मंगळवेढा यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली देवुन सांगीतले की, शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातुन हातातील बेडग्याने ( कुदळीने ) तीन महिलाच्या डोक्यात मारुन व डोकीत दगड घालुन जिवेठार मारल्याचे सांगीतले आहे. व सदर आरोपीस पोलीस ताब्यात घेतले असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत.
सदर गुन्ह्याचा गु.र.नं. १६८ /२०२३ भादवि कलम ३०२ असुन आरोपीस अटक केलेली आहे. सदर खुन करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे का याचा तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस विशेष महानिरीक्षक मा. सुनिल फुलारी सो, कोल्हापुर परिक्षेत्र मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सो, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव सो, मा. श्रीमती राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे, सपोनि बापु पिंगळे, पोसई सौरभ शेटे, परि. पोसई धापटे, सपोफो अविनाश पाटील, सपोफो दत्तात्रय तोंडले, पोहेकॉ दयानंद हेंबाडे पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोना विठ्ठल विभुते, पोना विक्रम काळे, पोना बापु पवार, पोकों अजित मिसाळ, पोकॉ कैलास खटकाळे पोकों राजु आवटे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.