भीमा साखर कारखान्याच्या सभासदाना चांगला ऊसदर देणार - चेअरमन धनंजय महाडिक

भीमा साखर कारखान्याच्या सभासदाना चांगला ऊसदर देणार - चेअरमन धनंजय महाडिक

___________________________________________________

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि.५ साखर निर्यातिस परवागी मिळाल्याने सध्या साखरेस चांगले दर आहेत. तसेच केंद्र सरकारने २०% इथेनॉल वापरण्यास परवानगी दिल्याने पुढील काळात भिमा कारखाना लवकरच इथेनॉल प्रकल्प उभा करणार असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. ते भिमा सह.साखर कारखान्याच्या २०२२-२०२३ च्या ४३ व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नी प्रदिपन समारंभ प्रसंगी  बोलत होते.

         आज कारखान्याचे अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते आज सकाळी १०.३१ ला संपन्न झाला. या कार्यक्रमांच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै.भिमराव महाडीक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मंगलताई महाडिक, विश्वास उर्फ भैय्या साहेब महाडिक, विश्र्वजीत महाडिक,उपाध्यक्ष सतिश जगताप, शिवाजी गुंड, भारत पाटील, सुरेश शिवपुजे, महादेव देठे,विक्रम डोंगरे, सज्जन पवार, दत्ता कदम, शंकर वाघमारे, संभाजी पाटील,राहूल व्यावहारे, ॲड.आबासाहेब शिंदे,तात्या नागटिळक, संग्राम चव्हाण, पांडूरंग ताटे,राजू बाबर, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

या वेळी महाडिक पुढे म्हणाले कि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकारी साखर कारखानदारी संबंधित चांगले निर्णय घेतल्याने हा उद्योग स्थिरस्थावर झाला आहे.या वर्षी देखील साखर निर्यातीला परवानगी मागीतली आहे या साठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

साखर कारखानदारीला उपपदार्थ निर्मितीस आवश्यकता असल्याने व केंद्र सरकारने २०% इथेनॉल वापरण्यास परवानगी दिल्याने भिमा सह.साखर कारखाना येणार्‍या काळात प्रकल्प राबवणार आहे.

तसेच १५ ऑक्टोबर रोजी आपला गाळप हंगाम सुरू करणार असून हंगामाच्या पहिल्या दिवसापासून वीज निर्मीती केली जणार आहे, त्यासाठी भिमाच्या सभासदासह इतर ऊस उत्पादकांनी इतर कारखान्यास ऊस न देता भिमालाच ऊस गाळप करावा, जेणेकरून आपल्याला चांगला दर देणे शक्य होईल असे म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भिमाचे उपाध्यक्ष सतिश जगताप यांनी केले तर प्रास्ताविक पांडूरंग ताटे यांनी मानले.

        सध्या केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने व मी स्वतःच खासदार असल्याने भिमाच्या सभासदासह कामगाराना नक्कीच चांगले दिवस येतील यांची ग्वाही दिली.