श्री .संत दामाजी कारखाना वरती केलेले आरोप बालिशपणाचे – संचालक दिगंबर भाकरे
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्युज ) मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांची कारखान्यात असलेली सत्ता भालके परिचारक याच्या समविचारी आघाडीने खेचून श्री. संत दामाजी कारखाना आ. आवताडे विरोधक समविचारी पक्षाच्या ताब्यात गेल्यामुळे आमदार आवताडे व समविचारी पक्षात सध्या कारखान्यातील आर्थिक गैरव्यहाराबाबत आरोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत कारखान्याचे विद्यमान संचालक दिगंबर भाकरे यांनी विरोधकांना चांगलेच पलटवार घेतले आहे .भाकरे साहेब आपणास अहवाल समजत नसेल तर तज्ञलेखा परीक्षकाकडून अहवाल समजू घ्यावा.आपण१० वर्षे कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहात आपण ज्या अहवालावर बोलत आहात तो अहवाल आपणास समजत नसेल तर आपणास समजावणाऱ्या लेखा परीक्षकाकडून आहवाल समजून घ्यावा.आपल्या पाठीमागच्या ५ वर्षाच्या कार्यकालाचा अहवाल समजून घेत असताना ३१.०३.२०२२ या आपल्या कार्यकाळातील आकडेवारी नमूद आहे आपण ती आकडेवारी अभ्यासपूर्ण व डोळे उघडे ठेवून पाहून घ्यावी .आपल्या काळात ज्या बँकेकडून जी कर्जे आपण घेतली त्या कर्जावरील व्याजाची तरतूद आपण कुठेही केली नाही.तसेच कर्जाची असणारी आकडेवारी स्पष्टपणे अहवालामध्ये आहेत आपण पाहून घ्यावेत.
परिशिष्ट ४ :- ३१.०३. २०२२ अखेर ३८ कोटी ७७ लाख, परिशिष्ट ५ :- १ कोटी १९ लाख, परिशिष्ट ६ :- २ कोटी ६२ लाख, परिशिष्ट ७ :- ३ कोटी २५ लाख, परिशिष्ट ८ :- ११२ कोटी ८३ लाख, तसेच ३१.०३.२०२२ नंतरचे आपल्या कार्यकाळातील बँक व इतर अॅडव्हांस खालीलप्रमाणे:- यशोदा पतसंस्था :- ३ कोटी २३ लाख मोलेसेस :-११ कोटी साखर विक्री अॅडव्हांस :- ५ कोटी ५० लाख १७८ कोटी ३९ लाख मुद्दल व आपण आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात या कर्जाच्या रकमेवरील व्याज तरतूद केलेली नाही या रकमेची व्याजाची रक्कम काढली असता जवळपास ४० कोटी रु रक्कम व्याज देणे शिल्लक आहे याचा हि अभ्यास आपण तज्ञ लेखा परीक्षकाकडून अवगत करून घ्यावे तसेच खाजगी व्यापाऱ्याकडून वार्षिक ३६ %व्याज दराने एकूण १६ कोटी ५० लाख रु कोणी आणि कशासाठी इतक्या व्याजदराने घेण्यात आले याचा खुलासा माजी संचालक व कारखान्याचे हितचिंतक म्हणून आपणास माहित नसेल तर माहिती करून आपण खुलासा करावा जर आपल्याला वरील माहिती खोटी वाटत असेल तर आपण आपल्या कारखान्यावरती येवून समोरासमोर चर्चा करावी आपण दिलेली माहिती तालुक्यातील ४० हजार सभासदाची फसवणूक व दिशाभूल करणारी आहे. माझ्या सारख्याला विद्यमान संचालक म्हणून असे वाटते कि आपण एका नामवंत जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कामकाज केले असल्याने अशा प्रकारचे न समजणे इतपत अडाणी सारखे बोलून सभासदाचे रोष ओढवून घेऊ नये.