वसंत कोल्ड स्टोरेज वाखरी येथे स्वर्गीय वसंतराव (दादा) काळे यांना अभिवादन...
--------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील वसंत कोल्ड स्टोरेज येथे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, चेअरमन स्वर्गीय वसंतराव ( दादा ) काळे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त वसंत उद्योग समूहाच्या वतीने स्वर्गीय वसंत(दादा) काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वसंत(दादा )काळे यांच्या प्रतिमेचे पूजन वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव व कृषी वसंत निधी लिमिटेडचे, चेअरमन विलासराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रमेश नागणे, दाजी चव्हाण ,रामचंद्र पाटील, रामभाऊ काळे ,सुनील पवार, राघवेंद्र खंडेलवाल, समाधान सुरवसे शरद काळे कैलास लोखंडे ,प्रसाद पवार ,शिरीष अनुसे ,नागेश वाघमोडे ,महादेव गायकवाड, संजय सुरवसे ,समाधान सूर्यवंशी ,दिलीप पासले ,दूध डेरी चे व्यवस्थापक आदर्श कराळे तसेच बेदाणा उत्पादक शेतकरी व वाहन मालक उपस्थित होते.