कासेगांव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कै. श्रीमंत दौलतराव उर्फ बाबासाहेब देशमुख यांची पुण्यतिथी साजरी.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव दौलतराव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कै. श्रीमंत दौलतराव उर्फ बाबासाहेब देशमुख यांची १७ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. येथील प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यकार श्री. जीवन पाटील सर तसेच बाबांचे सहकारी स्वातंत्र्य सैनिक युसुफ भाई शेख यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जाधव गुरुजी श्री. शिवाजी तात्या मोरे श्री .चंद्रकांत देशमुख यांनीही त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमास त्यांचे सुपुत्र कासेगाव जिल्हा परिषद सदस्य व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव दौलतराव देशमुख ,आबासाहेब देशमुख ,संग्राम भैय्या देशमुख बाळासाहेब शेख, हरिभाऊ फुगारे, हंसराज देशमुख, प्रकाश रुपनर ,औदुंबर निकम तसेच गावचे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक लवटे सर पर्यवेक्षक फडतरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.