कासेगांवच्या ग्रामस्थांनी केली पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे यांच्याकडे तक्रार... पंढरपूर तहसील कार्यालयातील वादग्रस्त पुरवठा निरीक्षकाने अन्नसुरक्षा यादीत नाव घालण्यासाठी अंध- अपंगाकडे केली होती पैशाची मागणी,
◼️ पुरवठा विभागात होतेय सर्व -सामान्य नागरिकांची हेळसांड,
◼️ अहो.. जिल्हाधिकाऱी साहेब या प्रकरणाकडे आपण स्वतः लक्ष घाला हो ,अंध -अपंगांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाहो..
◼️ पुरवठा निरीक्षक नाईक यांच्यावरील तक्रारी चौकशी समितीकडील अहवालाकडे शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष,
◼️ नाईक यांचा तक्रारी चौकशी समितीचा अहवाल पाच दिवसात सादर होणार ?
◼️ नावातच सदा -आनंद असणाऱ्या संबंधित पुरवठा निरीक्षकाने नागरिकांना आनंद देण्याऐवजी सदा रडवण्याचा प्रयत्न
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तहसील कार्यालयातील मुजोर ,वादग्रस्त व भ्रष्ट पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या गैरकारभाराची तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरुपात केली असल्याची माहिती कासेगाव येथील नागरिक शिवाजी देशमुख व अंध- अपंग नागरिकांनी यांनी केली आहे.
अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे अंध- अपंग तसेच सामान्य नागरिकांकडून दोन हजार रुपये घेत असल्याचे लेखी दिलेल्या तक्रारी म्हंटले आहे. कोविड कालावधीनंतर शासनाने पुढील पाच वर्ष धान्य मोफत देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे हे धान्य सर्वसामान्य अंध- अपंग वंचितांना मिळावे म्हणून गरजू अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला धान्य मिळेल अशा भोळ्या अपेक्षेने तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
अन्नसुरक्षा योजनेतील धान्य मिळेल या आशेने लाभार्थीनी हे संबंधित पुरवठा विभागाकडे रीतसर अर्ज दिल्यानंतर पुरवठा विभागातून अर्जदारकांना इष्टांक शिल्लक नाही असे सांगून संबंधित पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक ही वारंवार हेलपाटे मारावयाला सांगतात अंध अपंग असलेल्या गोरगरिबांचे अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी चक्क दोन हजार रुपयाची मागणी पुरवठा निरीक्षकांकडून होत असल्याची तक्रार कासेगाव येथील अंध- अपंग लाभार्थ्यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे .
या तक्रारी विषयी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित नागरिकांची दाद घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना गरजू नागरिकांना अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत तसे आदेश दिले होते मात्र पंढरपूरचे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे अजूनही लाभार्थ्याकडून आर्थिक द्वेषापोटी दखल घेत नसल्याने नागरिकांची हेळसांड होत असल्याचे शिवाजी देशमुख यांनी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे . पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी लाभार्थ्याची नावे अन्नसुरक्षा यादी तुमची नावे समाविष्ट करतो म्हणून लाभार्थ्याकडून दोन हजार रुपये मागणी करत चक्क स्वतः पुरवठा विभागातच बाजार मांडल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी संबंधित पुरवठा निरीक्षक यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी कासेगांव येथील ग्रामस्थांनी केली आहे.