गादेगावच्या शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मधील पाच विद्यार्थी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन

गादेगावच्या शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मधील पाच विद्यार्थी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील विद्यार्थ्यांचे नुकतीच एईटी मार्फत घेण्यात आलेले नीट परीक्षा 2024 यामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .यामध्ये नेहा मोरे नेहा 648 , मनीष गायकवाड 645 ,ऋतिक हाके 645 ,शाश्वत फडे 630, ओम माळी 627 ,असे गुण घेऊन दैदिप्यमान कामगिरी केली .त्याचबरोबर गाथा शेवाळे 584, पूजा पवार 581 ,संजीवनी पिसे 580 , सपना शेवाळे 565,प्रथमेश थोरात 560, प्रीती कलागते 559, हर्षदा यलमार 540 ,सानिका बागल 545 ,सुयश ओव्हाळ 537 , अश्विनी ढवळे 530,प्रतीक बाबर 527 असे घवघवीत यश संपादन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचा एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित होणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय शिवराज मोटेगावकर, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, सहशिक्षक वर्षा मोरे, राजेंद्र मोलाणे, नियाज मुलाणी, दीपक देशमुख, संतोष पवार, शितल बागल, लीना बागल, सोमनाथ भुईटे, नागेश कांबळे, शितल मस्के, मसरुद्दीन पटेल, सीमा रकटे, अजय मोरे व सर्व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगावचे विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी चमकताना नेहमीच दिसतात .नुकताच लागलेला बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल यामध्येही शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला असून शिवरत्न जुनिअर कॉलेज पंचक्रोशीतील व तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणपत मोरे यांनी यावेळी सांगितले.