पंढरपूर तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांचा उद्या सोमवार दि .१० रोजी गावभेटी दौरा...
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा तालुक्यातील गाव भेटी उपक्रमास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद......आता लक्ष पंढरपूरकडे.
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे हे मंगळवेढा शहर ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याकरिता त्यांच्याशी थेट संवाद साधून जनतेचा विकास साध्य करण्यासाठी"आमदार आपल्या दारी , उपक्रम सबंध तालुक्यात गाव भेटी उपक्रम राबविण्यात आला असून त्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे गाव भेटीदरम्यान दिसून आले .मंगळवेढा तालुक्याचा गाव भेट दौरा आटोपून ते आता सोमवार दिनांक १० जुलै रोजी पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्याकरिता तसेच हितगुज करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती पंढरपूर येथील संपर्क कार्यातून देण्यात आली .
आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांचे जीवनावश्यक प्रश्न व पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा विकास व्हावा तसेच भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उद्देशाने हे नेहमी मतदार संघात विकासाचा ध्यास घेऊन गावोगावी वाडी- वस्तीवरील गोरगरीब जनतेशी थेट संवाद साधण्यास ही माहीर असतात .निधी उपलब्ध करण्याकरता शासन दरबारी सतत प्रयत्न करणे, खेडोपाड्यातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला आहे, त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेपर्यंत मार्गी लावण्यासाठी मी आपल्याशी भाजपचे एकच मिशन नागरिकांचा विकास करणे हे संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याकरता सर्व विभागाचे शासकीय अधिकारी तसेच पक्षाचे प्रमुख, पदाधिकारी यांचे समवेत येणार आहे .तरी प्रत्येक गावातील शेतकरी ,नागरिक ,कार्यकर्ते बंधू भगिनी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
गाव भेट दौरा खालील प्रमाणे :-- मंगळवार दि.१० जुलै रोजी १) कासेगाव, २) खर्डी, ३) उंबरगांव, ४) बोहाळी, ५) लक्ष्मी टाकळी, ६) कोर्टी, ७) गादेगाव, ८) वाखरी, ९) शिरढोण, १०) कौठाळी.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मंगळवार दि.११ रोजी, गाव निहाय खालील प्रमाणे:-१) रांजणी, २) मुंढेवाडी, ३) गोपाळपूर, ४) अनवली, ५) एकलासपूर, ६) शिरगाव, ७) सिद्धेवाडी/ तरटगाव /चिचुंबे, ८) तावशी, ९) तनाळी, १०) त शेटफळ.इ. गावातील नागरिकांचे विविध प्रश्न अडीअडचणी सोडवण्यात साठी पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे ही नागरिकांशी संवाद साधणार आहे .तरी ग्रामस्थांचे निवेदने, लेखी अर्ज आपला फोन नंबरसह देण्यात याव्यात ते स्वीकारण्यात येतील नागरिकांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.