बनावट कागदाची फेरफार केल्याप्रकरणी शालीवान कोळेकर सह. तलाठी- मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल..!

बनावट कागदाची फेरफार केल्याप्रकरणी शालीवान कोळेकर सह. तलाठी- मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल..!

-----------------------------------------------------------------------------------
तलाठी व मंडल अधिकारी यांनी केलेल्या करामतीमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) :  गुरसाळे तालुका पंढरपूर येथील रहिवासी असलेले शालिवाहन भागवत कोळेकर व त्यांच्या पत्नी विजया शालिवाहन कोळेकर यांनी तुंगत येथील कर्मयोगी सु .रा. परिचारक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून आपली शेतीचे गहाणखत करून साडेसहा लाखाचा कर्ज घेतले होते. मात्र ही कर्ज न ठेवता त्यांनी पतसंस्थेचे घेतलेले कर्ज वेळेवर न फेडता मुद्दाम होऊन थकवले होते.

त्यानंतर आपल्या सातबारा उताऱ्यावरील सु .रा .परिचारक यांचा बोजा कमी करण्यासाठी कर्ज न फेडता शालिवाहन कोळेकर यांनी पतसंस्थेचे बनावट लेटर पॅड सही शिके तयार करून त्यावर बोजा कमी करण्यात खोटं पत्र तयार केलं व त्याद्वारे गुरसाळे येथे तलाठी विष्णू सदाशिव खडतरे व मंडळ अधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर यांच्याशी संगणमत करून आपले शेतावरील कर्जाचा बोजा पंचनामा करून कमी करून दिला.

याबाबत त्यांनी संस्थेस कोणतीही विचारपूस न करता संस्थेची फसवणूक केली आहे. त्यामुळे कर्जदार शालिवाहन भागवत कोळेकर पत्नी विजया कोळेकर गाव कामगार तलाठी विष्णू फडतरे व मंडल अधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर सहा जणांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.