मराठा समाज आरक्षण आंदोलनाची मशाल पंढरपूर मधून पेटणार, सकल मराठा समाजाचा एकमुखी निर्णय

मराठा समाज आरक्षण आंदोलनाची मशाल पंढरपूर मधून पेटणार, सकल मराठा समाजाचा एकमुखी निर्णय

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्युज) अंतवरली  सराटी गावामध्ये पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर केलेल्या बेछूट लाठीचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन चालू असताना जाळपोळही करण्यात आली असून त्याचे पडसाद आज पंढरपुरात  उमटल्याचे दिसून आले, पंढरपुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दि. 2 रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करत पोलीस आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याविरुद्ध विरोधातही मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांचे जालना येथे उपोषण चालू आहे. मराठा समाज सकल मोर्चाचे समन्वयक मनोज जरंगे यांच्यासह दहाजण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसली आहेत. यामध्ये उपोषणकर्त्या आंदोलकाची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी झुगारून लावले त्यानंतर पोलिसांनी आंदोलकावर लाटी चार्ज करण्यात आला तर काही मराठा समाज बांधव भगिनी हरिपाठ भजन करत असताना त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला.या घटनेची तीव्रप्रसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी आंदोलन निषेध केले जात आहेत.

या घटनेचे पडसाद पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार सकाळी दहा वाजता मराठा सकल समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या विरोधातही जोरदार आंदोलन करण्यात आले ,त्यात राज्य शासनाचाही निषेध करण्यात आला. जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्या नंतर मराठा समाज आक्रमक होऊन शासन दरबारी आपली नाराजी व्यक्त करत आहे. सोबतच मराठा क्रांती मोर्चा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतय. यासाठी शनिवारी मुंबईत तातडीची बैठक बोलवली आली आहे.जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत. जालना मध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरण सत्ताधारी भाजपा ,शिंदे गटाची डोके दुखी वाढवणारं आहे.

आज पंढरपूर मध्ये देखील मराठा समाज बांधव एकत्रित येऊन सरकारच्या दडपशाही चा विरोध करताना दिसले.

प्रकरण संवेदनशील असल्याने राज्यसरकार गंभीर आहे.

पण शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक लाठीचार्ज करून आंदोलन विस्कटण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न अनुत्तरीत आहे, ठिकठिकाणी मराठा बांधव एकत्रित येऊन सरकारच्या या विकृत कृत्याचा निषेध करत आहे, सोबतच मराठा समाज सरकार च्या दडपशाही चा प्रखर विरोध करताना दिसतोय, सर्वच राजकीय पक्षातील मराठा नेत्यांनी एकत्रित येऊन समाजा साठी लढले पाहिजे असा सूर उमटत आहेपंढरपुरातील मराठा समाजाच्या बांधवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकूल पुतळाप्रेताची ताटी तयार करुन ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चप्पल लाईन अशी पुतळाप्रेत यात्रेची जोडी  मारून मिरवणूक करण्यात आली. शेवटी प्रेतयात्रेचे सार्वजनिक मुतारीत प्रतिमात्मक पुतळ्यास पेटवून  विसर्जन करण्यात आले . त्यानंतर तिसरा व दहावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे पंढरपूर  शहराध्यक्ष संदीप मांडवे श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, उपनगराध्यक्ष नागेश भोसले, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नागेश फाटे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, माजी संचालक तानाजी जाधव ,श्रमिक मुक्ती दल संघटनेचे अध्यक्ष मोहन अनपट, रणजीत जगताप ,मनसे तालुका प्रमुख शशिकांत पाटील, समन्वयक रामभाऊ गायकवाड ,विनोद लटके यांची आक्रमक भाषणे झाली. कार्यक्रमास नगरसेवक प्रशांत शिंदे ,सतीश शिंदे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी ,संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, गोपीदादा वाडदेकर ,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण ,जिजाऊ महिला ब्रिगेडच्या पंढरपूर तालुकाअध्यक्षा बागल मॅडम, विविध संस्थांचे पदाधिकारी आजी -माजी नगरसेवक,सकल मराठा समाजातील समाज बांधव आंदोलनात  मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे मराठा सकल समाजाच्या वतीने शेवटी सांगण्यात आले.