औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादला धाराशिव नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील..!

औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादला धाराशिव नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील..!

------------------------------------------------------------------------------------

छत्रपती संभाजीनगर (दै.पंढरी नगर न्यूज) : मागील अनेक दिवसांपासून उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आज अखेर केंद्र सरकारने या निर्णयालाला मंजुरी दिली आहे.सरकारच्या प्रस्तावाला अखेर आता मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे.

यापू्र्वी केंद्र सरकारने या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयात माहिती दिली होती. उस्मानाबादचं नामांतर करून 'धाराशिव' करण्याला काही हरकत नसल्याचे, केंद्र सरकारने याआधीच सूचित केले होते. मात्र औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची प्रक्रिया अजूनही विचाराधीन आहे, अशी केंद्र सरकारची भूमिका होती. मात्र आज अखेर या दोन्ही नामांतराला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

'धाराशीव'बाबत अडचण नाही, मात्र औरंगाबादचं नामांतर केंद्राने ठेवले वेटिंगवर मागील महाविकास आघाडी सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याबाबतचा प्रस्ताव ठाकरे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. ठाकरे सरकार पायउतार होण्याआधी उद्धव ठाकरेंनी अखेरच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाबाबतचा निर्णय घेतला होता.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील मात्र ठाकरे सरकार पायऊतार होऊन, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या या नामांतराबाबतचा प्रस्ताव रद्द करून, नव्याने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. यात औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याबाबतचा नव्याने समावेश करण्यात आला होता. आज अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या या सुधारीत प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे.