सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वासर्वे मारुती नवलेवर पोलिसात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
---------------------------------------------------------------------------------
सांगोला (पंढरी नगरी न्यूज ) सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील रहिवासी व नामांकित बलाढ्य शिक्षण सम्राट मारुती नवले यांनी सिटी स्कूलच्या सव्वाशे होऊन अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करून भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता तब्बल 70 लाख 92 हजार 862 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाकडे जमा न करता त्यांनी स्वतःच हडप केल्याने त्याची न्यायालयीन चौकशी सुरू होती. त्यामध्ये पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल केल्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले असून सिंहगड इन्स्टिट्यूट चे संस्थापक मारुती नवले यांच्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी राहुल कोकाटे वय 51 रा .तूपेनगर हडपसर यांनी कोडवा पोलिसाकडे फिर्यादी दिली आहे. हा प्रकार कोंडवे येथील टिळेकर नगर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट स्कूलमध्ये ऑक्टोबर 2019 30 जून 2022 पर्यंत घडला होता अखेर मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.