आमदार समाधान आवताडे यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले..

आमदार समाधान आवताडे यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले..

------------------------------------------------------------------------------------

आंधळगाव (दै.पंढरी नगरी न्यूज ) : मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नोटबुक, खाऊ देऊन बैलगाड्यातून गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने केले स्वागत आहे.

मतदार संघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोई घर व वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डीपीडीसी निधी उपलब्ध करुन देण्याचे ग्वाही पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली. जिल्हा प्राथमिक व परिषदेसह महानगरपालिका व नगर परिषदांच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणच्या शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हि आंधळगाव ता. मंगळवेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले. जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून आला.

याप्रसंगी नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले. 

या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. अभ्यासाची गोडी त्यांच्यामध्ये वाढीस लागते. 

यासोबतच, ज्ञानार्जनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याचे आवाहन आमदार महोदय यांनी शिक्षकवर्गाला केले.

यावेळी गटविकास अधिकारी योगेश जी कदम , गटशिक्षण अधिकारी दर्शन जी मेहता , दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश आण्णा भाकरे साहेब, राजमाता बँकेचे संचालक पांडुरंग भाऊ भाकरे, सरपंच लव्हाजी जी लेंडवे, संचालक दिगंबर भाकरे, युवक नेते निलेश दादा आवताडे, शिक्षण विस्तार अधिकारी शाम सरगर यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रसंगी ग्रंथ दिंडीचे आयोजनही करण्यात आले.