"पंढरी नगरी न्यूज" परिवाराकडून असंख्य वाचकांना भोगी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा... तिळगुळ घ्या गोड.. गोड.. बोला

"पंढरी नगरी न्यूज" परिवाराकडून असंख्य वाचकांना भोगी मकर संक्रांतीच्या  शुभेच्छा...  तिळगुळ घ्या गोड.. गोड.. बोला

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज): मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यंदा 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांती आहे आणि त्यामुळे भोगी 14 जानेवारी रोजी भोगी ही साजरी केली जाईल. भोगीच्या दिवशी इंद्र देवाला स्मरून पूजा केली जाते. भोगीच्या दिवशी विवाहित महिला अभ्यंगस्नान करतात. तसेच शेतकरी रब्बी हंगामातील पीकाचे पूजन करून वर्षभर घरात धनधान्याची भराभराट होऊ दे यासाठी प्रार्थना केली जाते.

भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाजीला विशेष महत्त्व असते. भोगीच्या दिवशी पावटा, घेवडा, हरभरा, वांगे, कांद्याची पात, शेंगदाणे यांचा वापर करुन एक भाजी तयार करण्यात येते. तसेच विविध धान्यांचे पीठ एकत्र करुन तिळासह भाकरी सुद्धा बनवण्यात येतात किंवा तीळ लावून बाजरीची भाकरी तयार केली जाते. या भाकरीसोबत भोगीच्या दिवशी तयार करण्यात आलेली भाजी खाण्यात येते.

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करण्यात येणारा भोगीचा सण हा आपल्या कुटुंबासोबत साजरा करा. तसेच एकमेकांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा. भोगी सणाच्या  या मेसेजेसद्वारे आमच्या असंख्य वाचकांना खूप खूप शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला.