आमदार प्रणिती शिंदें यांच्या गाव संवाद सभेला पंढरपूर तालुक्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) भाजपला गाव बंदी नाहीतर घर बंदी करा असे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाला केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात गाव भेटी दौरा सुरू केला आहे.काही गावात मराठा आरक्षण मुद्द्यावरून त्यांना गावा येण्यास विरोध हाेऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार शिंदेंनी ज्यांनी तुम्हांला फसविले त्यांना गाव नव्हे तर घर बंदी करा पवित्रा घेत मराठा समाजाला आवाहन केले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान आज (बुधवार) पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, कौठाळी, गोपाळपूर गावात मराठा युवकांनी आरक्षणाच्या मागणीवरून आमदार शिंदे यांच्यासमाेर गोंधळ घातला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या खरतर विरोध भाजपचा झाला पाहिजे. त्यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन खेळी केली आहे. उघडं पाडण्याची वेळ आली आहे. भाजप पुन्हा खोटे नाटे सांगून लोकांची दिशाभूल करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गाव बंदी केली पाहिजे, घरबंदी केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नागेश फाटे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे, सरकोलीचे रमेश भोसले ,उदयसिंह पवार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.