पंढरपूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले..!
------------------------------------------------------------------------------------
गावा गावात बैठकांचा सिलसिला : पडद्यामागील घडामोडिंना वेग
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील बार्डी, तुंगत, खेड भोसे, सुगाव खुर्द, खरातवाडी, मेंढापूर, नेमतवाडी, टाकळी गुरसाळे, अजोती, व्होळे, पुळुजवाडी या ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी राजकीय घमासान सुरू झाले आहे. या ११ ग्रामपंचायत मध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी तब्बल ६१ आणि सदस्य पदासाठी ४२३ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत . या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गाव गावचे पुढारी रिचार्ज होऊन कामालाही लागले आहेत कार्यकर्त्यांशी गाठीभेटीचा सिलसिला सुरू केला आहे या निमित्ताने कार्यकर्त्यांना आता महत्त्व आले आहे.
सध्या कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांसाठी घोषणांचा पाऊस सुर आहे विकास कामे विरुद्ध भ्रष्टाचार असा प्रचाराचा कलगीतुरा रंगणार आहे आत्तापासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत मतांचा गट्टा असणाऱ्या कार्यकर्त्यांना आता सोन्याचा भाव येणार आहे अशा कार्यकर्त्यांना पटवण्यात राजकारणी कसे यशस्वी होतात यावरच यश अपयशाची गणिते अवलंबून असणार आहेत.
एकूणच आता पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे गेल्या दोन-तीन महिन्यापासून ग्रामपंचायत निवडणुका बाबत उलटसुलट चर्चा होती. आधी ग्रामपंचायत कि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार याची चर्चा ग्रामीण भागात रंगली होती पण निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्याने यावर अखेर पडदा पडला आहे. परंपरेनुसार प्राधान्याने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आधी होत असत त्यावर गावचे ग्रामपंचायतची राजकीय समीकरणे अवलंबून असतात त्यानुसार गावोगावी गटतटांची बांधणी होत होती पण आता या उलट समीकरणे होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या अडचणी वाढणार आहेत.
◼️ चौकात चौकात रंगल्या चर्चा
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा सुरू झाली चौका चौकात कट्ट्यावर लोक याबाबत चर्चा करताना दिसत आहेत आत्तापर्यंत कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुरू असलेली चर्चा मतदारांपर्यंत पोहोचली आहे ग्रामीण भागातील मतदारांची मनधरणी करताना आता पुढार्यांना कसरत करावी लागणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या तसा ग्रामीण राजकारणांनी वेग घेतला आहे. याठिकाणचे राजकारण तापू लागले आहे. गाव पुढाऱ्यांची मतदारांवर प्रभाव असणारे कार्यकर्ते मिळवण्यासाठी धावा धाव सुरू आहे.
खुले सरपंच पद असलेल्या ठिकाणी अत्यंत चुरशिने निवडणूक होणार आहेत. या ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे सरपंच पदाबरोबरच सदस्य पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. थेट जनतेतुन सरपंच पद असल्याने गावची सारी सूत्रे सरपंचाच्या हातात राहणार आहेत. प्रत्येक गटाचे सरपंच पदाचा उमेदवार हे पहिले टार्गेट असणार आहे पॅनल प्रमुखांना सरपंच पदाचा उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उमेदवार हा जनतेच्या पसंतीस उतरणारा आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या मर्जीतील असा महत्त्वाचा निकष महत्त्वपूर्ण ठरणार आहे खुल्या प्रवर्गातील सरपंच पदासाठी पॅनल प्रमुखांपैकी कोणाला तरी एकाला संधी मिळणार हे उघड गुपित आहे. कारण सत्तेच्या चाव्या कोणीही दुसऱ्याच्या हातात देणार नाही हे वास्तव आहे. कारण केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत यांना मिळत असतो.
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पुढारी आजी- माजी सरपंच आणि ग्रामपंचायत यांचे भावी सदस्य सरपंचांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आत्ता कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर उडी घेत आहेत गावपातळीवरील निवडणुकीत तरुणांचा चांगलाच सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यातून अनेकांची एकाधिकारशाही ही संपुष्टात येणार आहे .
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक नेत्यांनी गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसणार आहे निवडणूक आणि मतदानाबाबत आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांची जुळवाजवळ करावी लागत आहे निवडणुकीत होणारा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. पंढरपूर तालुक्यातील निवडणुुक लागलेल्या ग्रामपंचायत मध्ये गुलाबी थंडीत गावागावातील राजकारण तापू लागले आहे पॅनलच्या उभारणीसह उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.
◼️ गावकीच्या राजकारणात तरूणांचा डंका....
ग्रामीण भागात गावकीच्या राजकारणात तरुण उतरला केवळ राजकारण करायचे म्हणून नव्हे तर गावकीच्या सुधारणेचा ध्यास घेऊन आजही अनेक तरुण गावकीच्या राजकारणात उतरू पाहत आहेत. अर्थात सर्वचजण सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन नाही पण त्यांना निवडणूक आणि नेतेगिरीचे आकर्षण वाढले आहे. हे मात्र नक्की ग्रामपंचायतच्या निवडणुका अनेक अर्थाने प्रतिष्ठेच्या केल्या जात आहेत. अन्य निवडणुकांमध्ये एकत्र असणारे मंडळी गावाच्या राजकारणात मात्र एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात नातीगोती विसरून या निवडणुका शब्दशहा लढविल्या जातात आतापर्यंतचा अनुभव पाहता गावातील राजकारणात तरुण वर्गाला फारसा रस नव्हता किंवा इच्छा असूनही त्यांना यामध्ये येणे सोपे नव्हते अलीकडे मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढला आहे.
नोकरी व्यवसाय या करिअरच्या गोष्टींचा विचार करणारी तरुणाई आता राजकारणाकडे ही करिअर म्हणून पाहू लागली आहे. निवडणुकीची आपली हाऊस गावपातळीवर भागवण्याचा पर्याय अनेक तरुणांनी निवडलेला दिसतो त्यामुळे गावकीचे राजकारण हा बुजुर्ग मंडळीचा असलेला प्रांत तरुणाईने काबीज केला आहे. पूर्वीच्या काळी तरुण सहजासहजी निवडणुकांकडे वळण्याचे लांबच पण साधे मतदान करण्यास उत्सुक नसायचा त्याला परिस्थितीनुरूप कारणे ही तसेच होती अनेक वेळा मोठमोठ्या पक्षात तरुण चेहऱ्यांना संधी मिळत नव्हती ज्यांना मिळायची त्यांची राजकीय पार्श्वभूमी असायची त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्व करणारे नाराज होऊन क्षेत्रापासून लांब राहायचे मात्र अलीकडच्या काळात त्यामध्ये खूप बदल झाला आहे.
काही राजकिय गट आणि पक्षांनी आपली ध्येय धोरणे बदलून युवकांना प्राधान्य द्यायचे ठरवली हेही निवडणुकांकडे आकर्षित होण्याचे कारण मानावे लागेल दिवसेंदिवस राजकारणाबाबतची सजगता वाढत आहे तरुण घराबाहेर पडून संघटन करत आहेत निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापासून उमेदवार विजयी करण्याबाबत सर्व नियोजन सध्या तरुण करत असल्याचे दिसून येत आहे ही परिस्थिती ग्रामीण भागात दिसत आहे सध्या तरुण राजकारणाकडे करिअर म्हणून पाहू लागले आहे तर राजकारण भ्रष्ट झाले आहे हे मान्य असतानाच त्यात सुधारणा करण्याच्या इराद्याने तरुणाई राजकारणात दाखल होत आहे.
◼️ तुंगत ग्रामपंचायतीसाठी अटी-तटीची लढत
राजकिय दृष्ट्या संवेदनशील असणार्या तुंगत ग्रामपंचायतीची निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असुन या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिला असल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ५ प्रभागातुन १३ सदस्यांची निवड होणार असुन सन २०१७ पर्यंत या ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रकाश पाटील गटाची होती मात्र २०१७ चे निवडणुकित प्रशांत परिचारक गटाने पाटील गटास मोठे आव्हान देत ग्रामपंचायतीवर सत्तांतर घडवुन आणले आणि थेट जनतेतुन सरपंच होण्याचा पहिला मान परिचारक गटाचे आगतराव (मास्तर) रणदिवे यांना मिळाला.आता पुन्हा या ग्रामपंचायतीवर सत्ताधारी परिचारक गटाचे समोर विरोधकांनी आव्हान उभे केले असले तरी मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार याची उत्सुकता पंढरपूर तालुक्यात लागलेली आहे.