कल्याणराव काळे यांच्या गाव भेटी सभेला कासेगाव गटात सभासदांचा जोरदार प्रतिसाद
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यातील वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक प्रचारा पूर्वी कल्याणराव काळे यांनी कासेगाव गटात सभासदांच्या गावभेटी कार्यक्रम सुरू केला असून त्यास सभासदाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे कल्याणराव काळे हे काल कासेगांव गटातील सिद्धेवाडी, तावशी, चिचुंबे, एकलासपूर, अनवली या गावातील ऊस उत्पादक सभासदांना भेटत आहेत ,ऊस उत्पादक सभासदांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कल्याणराव काळे यांनी प्रत्येक गावातील वाडी - वस्तीवर जाऊन सभासदाची हितगुज करून समस्या जाणून घेत आहेत कासेगाव गटात पहिली फेरी पूर्ण केली आहे .
ऊस उत्पादक सभासदांची ऊस बिले ७०% दिली आहेत तसेच राहिलेली रक्कम लवकरात लवकर देणार आहे असे त्यांनी भेटीदरम्यान सांगितले, त्यामुळे सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे कल्याणराव काळे यांच्या गाव भेटीला मोठी गर्दी होत आहे.
यावेळी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव सरदार, तानाजी जाधव, योगेश ताड, जयसिंह देशमुख, संजय गांधी ,बाळासाहेब आसबे ,बलभीम जाधव, बब्रुवान जाधव ,दशरथ पाटील ,अजित जाधव ,डी .डी जाधव सर ,सुनील जाधव, मच्छिंद्र जाधव तुकाराम वासुदकर. सुनील घुले. रामचंद्र वळणे ,नानासाहेब ताटे, पी .एन पाटील. औदुंबर जाधव साहेबराव जाधव. आत्माराम शिंदे. सतीश जाधव. सुभाष जाधव .सुशीलकुमार जाधव. नागनाथ जाधव .महादेव सूर्यवंशी. कालिदास ताड. बासू ताड .चांगदेव मोलाने इत्यादी शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.