स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जबर झटका.... अखेर उपोषणास बसताच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी मान्य

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जबर झटका.... अखेर उपोषणास बसताच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी मान्य

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर पैठण या संत एकनाथ महाराज पालखी महामार्गावरील कौठाळी - व्होळे बंधाऱ्यावरील पाईपचे संरक्षण बॅरीकेट गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने बसवले नसल्याने व या बंधाऱ्यावरील रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचे पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्रीच्यावेळी बंधाऱ्यावरून प्रवास करताना नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हे पाईपचे संरक्षण बॅरीकेट लवकरात लवकर बसवण्याच्या मागणीचे निवेदन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे यांनी सार्वजनिक बांधकाम पंढरपूर अभियंता यांना दिले होते.

परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आनंद लोंढे यांनी बांधकाम उपविभाग पंढरपूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु आज बांधकाम उपविभाग अभियंता यांनी लोंढे यांना उपोषणस्थळी येऊन लोंढेच्या संबंधित मागणीस तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल व व बंधाऱ्यावरील संरक्षण पाईप बॅरिकेटचे काम पूर्ण केले जाईल असे लेखी पत्र दिले त्यानंतर लोंढे आपले उपोषण तात्पुरत्या परिस्थितीत स्थगित केले आहे.