सोलापूर येथील प्रकार; कॉन्ट्रॅक्टदाराकडून शिक्षिकेवर बलात्कार, आरोपीला पोलीस कोठडी

सोलापूर येथील प्रकार; कॉन्ट्रॅक्टदाराकडून शिक्षिकेवर बलात्कार, आरोपीला पोलीस कोठडी

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) :  सोलापूर येथील शिक्षकेने हात उसने घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.आणि मी तुला साथ देतो असे म्हणत एका शिक्षक महिलेवर बलात्कार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली.

या प्रकरणात जोडभावी पेठच्या पोलिसांनी राहुल मोहनराव माकणे (वय ४० रा.९०जी भवानी पेठ,अन्नपूर्णा नमकीन जवळ) या कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

राहुल माकणे या कॉन्ट्रॅक्टरने एका ३५ वर्षीय शिक्षक महिलेकडून फेब्रुवारी २०१८ ते जून २०१९ या कालावधीत ४ लाख ६७ हजार रुपये हात उसने घेतले होते.त्यानंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. आणि त्या महिलेस माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला शेवटपर्यंत साथ देतो. तसेच नोकरीसाठी ८ ते १० लाख रुपये देतो असे म्हणत तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरात बोलावून वेळोवेळी अत्याचार केला. आणि तिला शिवीगाळ केली. असे पिडितेच्या फिर्यादीत नमूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी माकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. महिला फौजदार व्हट्टे या पूढील तपास करीत आहेत.