आज - स. शि. वसंतराव काळे सहकारी कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
-----------------------------------------------------------------------------------
भाळवणी (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आज शुक्रवार दि.२९/०९/२०२३ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपट घोगरे यांनी दिली.
सदरहु सभेमध्ये मागील दि. ३० /९/२०२२ रोजी चे आधि मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, दि. ५/४२०२२ रोजीचे आधि मंडळाच्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे ,२०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेल्या राजीनामामुळे नवीन नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांचे नेमणुकीस मान्यता देणे, दि. १/४/२०२२ ते ३१ /३/ २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद नफा तोटा पत्रक स्वीकारून मान्यता देणे, सन-२०२१ - २०२२ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारून त्यास मान्यता देणे ,दि.१/४/२०२२ ते ३१ /३/२१३ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे, सन -२०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षाचे महसुली व भांडवली अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चाची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे ,सन - २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षाकरिता तयार केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे व निधी उभारण्याकरिता सुचवलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे ,सन - २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखा परीक्षणासाठी शासनमान्य नाम तालिकेतून लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्याचा मेहताना ठरविणे, सन- २०२३ - २०२४ मधील इन्कम टॅक्स ऑडिट जीएसटी ऑडिट कॉस्ट व एनर्जी ऑडिट कामाकरता कन्सल्टंट ऑडिटर यांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहताना ठरविणे, सन- २०२२ -२३ मध्ये ई ॲक्शन द्वारे विक्री केलेल्या स्क्रॅप मटेरियल ची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे ,सन- २० -२२ -२३ या वर्षाच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितस मंजुरी देणे ,वअध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचना इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचार-विनीमय होणार असलेचे प्र.कार्यकारी संचालक प्रभारी कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी सांगितले.
तरी आपल्या सभासदांच्या मालकीच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दि.२९/९/२०२३ रोजी संपन्न होणा-या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व व्हा .चेअरमन भारत कोळेकर यांनी केले आहे.