जालना येथे मराठा आंदोलकांवर व माता भगिनीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भंडीशेगांव येथे सकल मराठा समाज वतीने निषेध आंदोलन व रास्ता रोको
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) भंडीशेगाव( ता.पंढरपूर) येथे जालना येथे झालेल्या मराठा बांधव माता भगिनी यांच्यावर झालेल्या करण्यात बिछोट लाठी हल्ला व गोळीबार करण्यात आलेल्या निषेधार्थ आज भंडी शेगाव येथे शासनाचा जोरदार आक्रमकपणे निषेध करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गीतानी आंदोलनाची सुरवात झाली. उपस्थित अनेक समाज बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ आपल्या भावना शासनाच्या विरोधात व्यक्त केल्या,यामध्ये प्रामुख्याने जालना येथे झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,जालना येथे झालेल्या लाठी चार्ज नंतर मराठा बांधवांवर नोंदवण्यात आलेली गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, त्याचबरोबर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल योग्य ते पावले उचलावीत, तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर 50% च्या आत ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे.
अन्यथा मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागेल, त्याचबरोबर एक जुटीने एक दिलाने सर्व मराठा समाज बांधव समाज हितासाठी राजकारण विरहित लढा देत आहेत. समाजाच्या भावना र्तीव असून ते समजून आपण लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात र्तीव पडसाद उमटतील यास प्रशासन जबाबदार असेल. यावेळी मराठा समाजा सोबत अठरापगड जातीतील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला. यावेळी पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.