मारापूर येथील शरदचंद्र कृषी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप..

मारापूर येथील शरदचंद्र कृषी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप..

------------------------------------------------------------------------------------
          
मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूर ता.मंगळवेढा ,येथे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती भावना व्यक्त करत सर्व शिक्षकांचा सन्मान पर सत्कार केला.
           
यावेळी पुढील शिक्षणासाठी नवीन ठिकाणी जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी भावना दिसून आली . यावेळी मनोगत व मार्गदर्शन सरपंच व संस्थेचे अध्यक्ष विनायक यादव यांनी केले.सदर मनोगत यावेळी बोलताना सरपंच  यादव यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता जिद्द,चिकाटी व अपार कष्ट या त्रिवेणी संगमाचा वापर करावा असे सांगितले.
          
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक आसबे हे होते.यावेळी युवा उद्योजक राजकुमार यादव,मुख्याध्यापक संजय फुगारे, उपमुख्याध्यापक महादेव घुले(सर ) ,व सर्व सहशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार  अशोक शिवशरण यांनी केले.